Saturday, February 27, 2010

नसतेस घरी तू जेव्हाजीव तुटका तुटका होतोजगण्याचे विरती धागेसंसार फाटका होतोनभ फाटून वीज पडावीकल्लोळ तसा ओढवतोही धरा दिशाहीन होतेअन्‌ चंद्र पोरका होतोयेतात उन्हे दाराशीहिरमुसून जाती मागेखिडकीशी थबकुन वारातव गंधावाचून जातोतव मिठीत विरघळणाऱ्यामज स्मरती लाघववेळाश्वासाविण ह्रुदय अडावेमी तसाच अकंतिक होतोतू सांग सखे मज कायमी सांगू या घरदारा ?समईचा जीव उदासमाझ्यासह मिणमिण मिटतोना अजून झालो मोठाना स्वतंत्र अजुनी झालोतुजवाचून उमगत जातेतुजवाचून जन्मच अडतो !

Saturday, February 6, 2010

या सुखांनो या.- वैदेही.

आमची वैदेही नुकतीच चालायला लागली तेव्हाची ही विडियो क्लिप। तेव्हा या सुखांनो या ही सीरियल जोमाने चालू होती। त्या सीरियल चे शीर्षक गीत आमच्या वैदू ला फारच आवडायचे। कसे ते या क्लिप मध्ये दिसेलच!

शिवानीचे पहिले संगणकीय चित्र.

हे आमच्या शिवानी ने संगणकावर काढलेले पहिले वहीले चित्र।

वैदेहीच्या शाळेतल्या नृत्य स्पर्धेची चित्र फीत. पारितोषिक प्राप्त.

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला - संदीप खरे.

कोमेजून निजलेली एक परी राणी

उतरले तोंड, डोळा सुकलेले पानी

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत.

निजेतच तरी पण येशील खुशीत.

सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला.

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना....

आटपाट नगरात गर्दी होती भारी.

घामाघुम राजा तरी लोकलची वारी।

रोज सकाळीच राजा निघताना बोले.

गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले।

जमलेच नाही काल येणे मला जरी।

आज परि येणार मी वेळेतच घरी.

स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी।

खर्र्या खुर्र्या परीसाठी गोष्टीतली परी।

मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला।

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना...

(संदीपचा आवाज) गद्य : ऑफिसात उशीरा मी असतो बसून।

भंडावले डोके गेले कामात बुडून।

तास-तास जातो खाल मानेने निघून.

एक-एक दिवा जातो हळूच विझून।

अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे.

आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे।

वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे।

तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे।

उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी।

चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

(सलीलचा आवाज) पद्य:

उधळत खिदळत बोलशील काही।

बघताना भान मला उरणार नाही।

हसूनिया उगाचच ओरडेल काही।

दुरूनच आपल्याला बघणारी आई।

तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा।

क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा।

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला।

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना...

(संदीपचा आवाज) गद्य:

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई।

मऊ-मऊ दूध भात भरवेल आई।

गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी।

सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी।

(सलीलचा आवाज) पद्य:

कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही।

सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही।

जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला।

आईपरी वेणी फणी करतो ना तुला।

तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा।

तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा।

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला।

दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना...

(संदीपचा आवाज) गद्य:

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात।

आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात।

आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा।

रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा।

लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं।

दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं।

(सलीलचा आवाज) पद्य:

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून।

हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून।

असा कसा बाबा देव लेकराला देतो।

लवकर जातो आणि उशीरानं येतो।

बालपण गेले तुझे-तुझे निसटून।

उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून।

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे।

नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे।

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं।

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं।

सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये।

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये।

ना ना ना ना ना ना ना ना ना ना...

- संदीप खरे।

Monday, July 13, 2009

बाळ आर्यन



हां माझा पुतण्या आर्यन , दि.२४ जून २००९ रोजी लीड्स, इंग्लैंड येथे एका बस अपघातात त्याने शरीर सोडले। आणि तो अनंतात विलीन झाला।
तरीही त्याच्या पित्याने एवढे प्रचंड दुःख असुनही अवघ्या ६ तासांत त्याचे डोळे दान करण्याचा, नेत्रदान करण्याचा निर्णय घेउन तो अमलातही आणला।
त्या बाळाची जन्म तारिख होती ३१ अक्टूबर २००६।

ఆర్యన్

Wednesday, February 11, 2009

आयुष्य खूप सुंदर आहे - मयूर ऑरकुट

आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,वादळात सगळं वाहून गेल,म्हणुन रडत बसू नका,वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नकामृगाकडे कस्तुरी आहे,फुलात गंध आहे,सागराकडे अथांगता आहे,माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजूनमग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसल तरीएकट्यानेच ते फुलवत रहा.....

पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय- द्वारा राहुल चेचर ऑरकुट

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचयरोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचायनव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपल नाव लिहायचायमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुननलाखाली हात धरून पानी प्यायचाय,कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्याचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचयसायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?हा विचार करत रात्री झोपी जायचय,अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.घन्टा व्हायची वाट का असेनामित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षादप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचयमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

Tuesday, February 10, 2009

आणि ही शिवानी
आमचं ज्येष्ठ कन्या रत्न
ही फारच स्वप्नालू









नेहमीच कोणत्या तरी विश्वात वावरत असते।


हे आमचं शेंडेफ़ळ।
वैदेही
तिच्या शाळेत फँसी कोँपिटीशन होती
तेव्हाचा हां फोटो













आणि हा तिला तीसरे बक्षीस मिळाले
तेव्हाचा फोटो
हे माझे आदर्श आहेत।
ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वेचले
त्यांच्या हौतात्म्याची कदर जनतेने केलीच पाहिजे.








श्री हेमंत करकरे




शब्दलेखन तपासा







श्री अशोक कामते

Friday, February 6, 2009

कुंभार - एक गुरु

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात।
तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी ।
घट जाती थोराघरी,
घट जाती राऊळात
कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी।
आव्याताली आग नाही पुन्हा आठवत
कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माथ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
अघात पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्नात
कवी - ग. दि. माडगूळकर

Wednesday, February 4, 2009

mअंगेश पाडगावकर कृत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?या ओळी चिल्लर वटतात?

काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,

फसल्या तर फसू दे !

तरी सुद्धा तरी सुद्धा ,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणूनप्रेम करता येतं;

उर्दुमधे इश्क म्हणूनप्रेम करता येत;

व्याकरणात चुकलात तरीप्रेम करता येतं;

कोन्वेंटमधे शिकलात तरीप्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली कीअंगात फुलं फुलू लागतात,

जागेपणी स्वप्नांचेझोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?तुमची आमची सोळा जेव्हा,सरली होती,

होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊननाचलो होतो,

होडी सकट बूडता बूडतावाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;

प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,मलासुद्धा कळलं होतं !

कारणप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतंम्हणणारी माणसं भेटतात,

प्रेम म्हणजे स्तोम नुसतंमानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण चक्क मला म्हणाला,“आम्ही कधी बायकोलाफिरायला नेलं नाही;

पाच मुलं झाली तरीप्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

आमचं काही नडलं का?प्रेमाशिवाय अडलं का?”

त्याला वाटलं मला पटलं !

तेव्हा मी इतकंच म्हटलं,

“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसातकधी भिजला असाल जोडीने,

एक चॉकलेट अर्धं अर्धंखाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधीतिच्यासोबत

तासन् तास फिरला असाल,

झंकारलेल्या सर्वस्वानेतिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,

डोळ्यांनीच हसणं असतं,

प्रेम कधी भांडतंसुद्धा !

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,

घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतंतुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !